। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी । महागाईने उच्चांक गाठला असून शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या व्यथा जशाच्या तश्याच आहेत. केवळ सत्तेच्या मोहापायी व सत्ता हस्तगत करण्याकडे सत्ताधारी प्रयत्नशिल आहेत, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोज आखरे यांनी केले. चिचोंडी पाटील सोसायटी व ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मनोज आखरे यांनी चिचोंडी पाटील येथे भेट दिली असता, त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रविण कोकाटे, नवनिर्वाचित सरपंच शरदभाऊ पवार, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, उपसरपंच जयश्री कोकाटे, सोसायटीचे चेअरमन महादेव खडके, जेष्ठ संचालक दिलीप पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते.
शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता : मंत्री सुधीर मुनगंटीवार
आखरे म्हणाले की, महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे. परंतु आज अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण केले जात असून राष्ट्रपुरूषांचा अवमान केला जात आहे.महागाईने उच्चांक गाठलेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, नागरिक यांच्या व्यथा जशाच्या तश्याच असून केवळ सत्तेच्या मोहापायी व सत्ता हस्तगत करण्याकडे सत्ताधारी प्रयत्नशिल आहेत.
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ
यासर्व बाबी पाहाता संभाजी ब्रिगेड आक्रमक भूमिका घेत असून शिवसेना व महाविकास आघाडी सोबत संघर्षासाठी सर्वात पुढे असेल. यापुढे विकासकामात आडकाठी आणल्यास रस्त्यावर उतरून ब्रिगेड स्टाईलने आंदोलन केले जाईल. अॅड.आखरे यांचा चिचोंडी पाटील येथील जेष्ठ नागरीक संघाचे फिसके, हजारे गुरुजी, गंगाधर दरेकर, करंडे गुरुजी तसेच भारतीय युवक संघाचे बबनराव शेळके, जैन संघाचे अभय छाजेड, स्थानिक स्कुल समितीचे दीपक कांबळे यांनी सत्कार केला.
ड्रायव्हरची करामत अद्दल घडवण्यासाठी घरफोडी!
यावेळी कामधेनु पतसंस्थेचे प्रमोद पवणे, अजय कांकरिया,काशिनाथ वाडेकर, बबन कोकाटे, विठलदेवा कोकाटे, विजय कोकाटे, भरत कोकाटे, विद्यासागर कोकाटे, बी.डी. ठोबरे, ज्ञानेश्वर ठोबरे, बाबासाहेब परकाळे, अक्षय परकाळे, महेश दानवे, प्रशांत कांबळे, संदिप काळे, मारुती कोकाटे, संदीप सुरवसे, शशिकांत कन्हेरे, दत्तु धुळे, कैलास ठोंबरे, गणेश गवांडे, दिनेश वाडेकर, गोरख वाडेकर, बाळासाहेब कोकाटे,नाना कोकाटे, महादजी कोकाटे, सद्दाम सय्यद, चंदुकाका पवार, अजय पवार, गणेश वाडेकर, राजू कोकाटे, बाळासाहेब खांदवे, विकास पवार, किरण मोरे, युवराज हजारे, राजू पवार, संतोष कोकाटे आदी उपस्थित होते.