ड्रायव्हरची करामत अद्दल घडवण्यासाठी घरफोडी!


।  सोलापूर । दि.07 फेब्रुवारी 2023 ।  शहरातील चोरी झालेल्या घरात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्यास अटक करून त्याकडून सर्व मुद्देमाल जप्त केला. शहर पोलीस दलातील क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत कसोशीने 

या चोरीचा तपास करून, ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या उमाकांत उर्फ उमेश बाबू यादव (वय. 30 वर्षे, रा. सुलेरजवळगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यास अटक केली. 

घरी काम करीत असलेल्या ड्रायव्हरवर आशिष पाटोदेकर व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी मोठा विश्वास  होता. उमाकांत उर्फ उमेश याने विश्वासघात करीत 45 लाख रुपयांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा मुद्देमाल बनावट चावीने लंपास केला होता. 

मालक नेहमी घालून पाडून बोलत असे, त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घरी चोरी केली असल्याची माहिती संशयित चोरट्याने पोलिसांना दिली. डीसीपी दीपाली काळे यांनी अधिकृत माहिती देत शंभर टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असल्याची माहिती दिली. 

🎯  स्मार्ट एलईडी पथदिवे प्रकल्पामुळे वीज बिलात बचत : मनपा उपायुक्तांचे स्पष्टीकरण

🎯  दुचाकी आडवुन दाम्पत्याला लुटणारे जेरबंद 

🎯  जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना 

Post a Comment

Previous Post Next Post