। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली की नाही, अशीच स्थिती सध्या आहे. आताचे सरकार फक्त राजकारणात गुंतले आहे व त्यांचे राज्य कारभारात लक्ष नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.
ट्रक्टर-ट्रॉलीची धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
संजय राऊत यांना धमक्या येत आहेत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणही सांगतात की त्यांचा पाठलाग होत आहे व जीवाला धोका आहे, प्रज्ञाताई सातव यांच्यावरही हल्ला झाला आहे. एवढेच नव्हे तर नगर जिल्ह्यात पाथर्डीत गुरुवारी रात्री सराफी व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाला व त्याच रात्री नगर तालुक्यातील नेप्तीजवळ शिवनाथ होले यांचा खून झाला आहे, लूट झाली आहे.
केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या कार्यक्रमात शेतकर्यांचा गोंधळ
इतके सगळे होत असताना महाराष्ट्रात कायदासुव् यवस्था राहिलेली नाही, कायद्याचा धाक राहिलेला नाही व राज्यातील सरकार फक्त राजकारणात गुंतले आहे, राज्य कारभाराकडे त्यांचे लक्ष राहिलेले नाही, असेच दिसत आहे, असेही दानवे यांनी आवर्जून स्पष्ट केले.
बनावट लिंकव्दारे व्यावसायिकाची फसवणूक
विरोधी पक्ष नेते दानवे यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. माजी महापौर सुरेखाताई कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे, आशा निंबाळकर, नगरसेवक श्याम नळकांडे, गणेश कवडे, सचिन शिंदे, माजी विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, संतोष गेनप्पा, संग्राम कोतकर, संदीप दातरंगे, श्रीकांत चेमटे, अभिजीत अष्टेकर, रमेश खेडकर, गौरव ढोणे, गोविंद हांडे आदींसह अन्य उपस्थित होते.
सावेडी उपनगरातील साई मंदिरात चोरी
तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युवा सेना राज्य सचिव विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे, दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी आदींसह अन्य उपस्थित होते.
शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व : प्रधानमंत्री