अहमदनगर क्‍लब मैदान ते चांदबीबी महालापर्यंतच्‍या वाहतुक मार्गामध्‍ये बदल

। अहमदनगर । दि.03 फेब्रुवारी 2023 ।  नगर रायझींग फाऊंडेशनकडुन अहमदनगर क्‍लब मैदान पासुन चांदबीबी महाल पाथर्डी मार्गावर मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले असून या परिसरात कायदा व सुव्‍यवस्‍था आबाधित राखण्‍यासाठी जिल्‍हा पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३३(१)(ब) नुसार दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत अहमदनगर क्‍लब मैदानापासुन चांदबीबी महालापर्यंत रोडवरील वाहतुकीच्‍या मार्गात खालीलप्रमाणे बदल केला आहे.

साईभक्तांकडून साईचरणी 12 लाख रुपयांचे सुवर्ण कमळ

पाथर्डीकडून अहमदनगरकडे येणा-या सर्व प्रकारच्‍या अवजड वाहतुकीस प्रतिबंध करण्‍यात आला आहे.  पाथर्डीकडून अहमदनगरकडे येणारे सर्व प्रकारचे हलके वाहने सारोळा बद्दीमार्गे, जामखेड हायवे मार्गे अहमदनगर मार्गे इच्छित स्‍थळी जातील.

गुन्हेगारांच्या शोधासाठी, त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी...

अहमदनगरनगडुन पाथर्डीकडे जाणारी हलकी वाहने जामखेड हायवे - सारोळा बद्दी-पाथर्डी रोडकडे जातील. आयकर भवन येथून अहमदनगर क्लब (भुईकोट किल्ला) कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी. अहमदनगर क्लब मैदान-लकडी पुल-कॉन्‍व्‍हेंट चौक-किल्ला ग्राऊंड चौक- अहमदनगर छावणी कार्यालयसमोरील चौक-जॉगींग पार्क चौक- कॅन्टोन्मेंट सी ओ निवासस्थानासमोरील चौक - नगर पाथडी महामार्ग या मॅरेथॉन मार्गावरील सर्व प्रकारची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात यावी.

2023-24 चा अर्थसंकल्प सादर : काय महाग काय स्वस्त

नगर पाथर्डी महामार्गावरील भिंगार येथील पंचशिल नगर वेस समोरील चौकापासून चांदबीबी महाल पर्यंतच्‍या रोडवर फक्त दुचाकी वाहने, शासकीस एस टी बसेस, अॅम्ब्युलन्स व इतर हलकी शासकीय वाहने यांना प्रवेश करता येईल.  हा आदेश अॅम्ब्युलन्स, शासकीय वाहने, संरक्षण विभागाची वाहने व मॅरेथॉन स्पर्धेकरीता आवश्यक असलेले वाहने यांना लागू राहणार नाही. 

सत्यजित तांबे यांना आता भाजपच्या 'या' नेत्याची ऑफर

Post a Comment

Previous Post Next Post