। अहमदनगर । दि.26 फेब्रुवारी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे राहील.
सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे येथून शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11-00 ते दुपारी 1-30 वाजेपर्यंत अहमदनगर जनसुनावणी व आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपस्थिती. दुपारी 1-30 ते 2-30 वाजेपर्यंतची वेळ राखीव. दुपारी 2-30 वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती.
दुपारी 3-00 ते सायं. 6-00 वाजेपर्यंत शाळा, कॉलेज, भरोसा सेल,वनस्टॉप सेंटर, मुलींचे वसतिगृह, दामिनी पथक आदी ठिकाणी भेटी. सायं 6-30 वाजता मनोज शिंदे, ढोकराई फाटा, नगर दौंड रोड, शिवाजीराव नागवडे दूध संघाशेजारी येथे लग्न समारंभासाठी उपस्थिती व बीडकडे प्रयाण करतील.