बनावट लिंकव्दारे व्यावसायिकाची फसवणूक

। अहमदनगर । दि.25 फेब्रुवारी । एका व्यावसायिकाला मोबाईलवर मेसेजव्दारे आलेली बनावट लिंक त्याने ओपन करून त्यावर ओटीपी टाकला असता, त्यांच्या खात्यातून 49 हजार 900 रूपये कट होऊन त्यांची फसवणूक झाली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्यावसायिक वैभव संजय टेमक (वय 26, रा. कवेडनगर, बालिकाश्रम रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र बालिकाश्रम रोडवरील कवडेनगरमध्ये राहतात.

त्यांची द्रोपदी इंजिनियरींग फॅब्रिकेशन वर्क्स नावाची कंपनी आहे. वैभव टेमक यांचे बँकेत खाते आहे. त्यांना बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर टेक्स मेसेजव्दारे एक लिंक आली.

फिर्यादीने ती लिंक ओपन केली असता, त्यांना एक ओटीपी विचारला गेला. त्यांनी तो ओटीपी लिंकवर भरला असता त्यानंतर लगेचच फिर्यादीच्या बँक खात्यातून 49 हजार 900 रूपये कट झाल्याचा मेसेज त्यांना आला.

त्यानंतर फिर्यादीने संबंधित बँकेच्या कॉल सेंटरला फोन करून बँक खाते ब्लॉक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post