। अहमदनगर । दि.02 फेब्रुवारी 2023 । गुन्हेगारांच्या शोधासाठी व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ’क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’ संगणक प्रणालीचा वापर नाशिक परिक्षेत्राच्या पाच जिल्ह्यात केला जाणार आहे. त्यासाठी परिक्षेत्राचे डॉ. शेखर यांनी पुढाकार घेतला आहे.
गुगलचा वापर करून या संगणक प्रणालीद्वारे गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच त्यांचे प्रोफाइल तयार करणे, गुन्हेगारावर कोण पोलिस कर्मचारी व केव्हापासून लक्ष ठेवून आहे, पोलिस कर्मचार्याने संबंधित गुन्हेगाराची पडताळणी केव्हा केली याची सर्व अद्ययावत माहिती या अॅपद्वारे वरिष्ठ अधिकार्याना मिळणार आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी ’क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टीम’ प्रणालीची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक संपत शिंदे आदी उपस्थित होते.
सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत असली तरी आरोपींचे शोध लागण्याचे, फसवणूक झालेल्यांना पैसे मिळवून परत मिळवून देण्यातही पोलिसांना यश मिळत आहे. परंतु बहुतांशी आरोपी परराज्यातील असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी जाणवतात असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यासाठी आणखी 500 पोलीस कर्मचार्यांची आवश्यकता आहे, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Tags:
Breaking