। अहमदनगर । दि.17 फेब्रुवारी । मारुतीराव मिसळवाले यांची नवीन शाखा जिल्हा मुख्य पोस्ट ऑफिस समोर,स्टेट बँक चौक येथे सुरु करण्यात आली असून या नवीन दालनाचा शुभारंभ आ संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विशाल गणपती ट्रस्ट चे विश्वस्त प्रा माणिकराव विधाते,उपमहापौर गणेश भोसले,कमलबाई मारुतीराव शिंदे(संस्थापक),संचालक राहुल खामकर,अमित खामकर,अतुल खामकर सह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते
सावेडी उपनगरातील साई मंदिरात चोरी
प्रास्तविकात बोलताना राहुल खामकर म्हणाले मारुतीराव मिसळवाले उद्योग समूह हा उद्योग समूह झाला आहे, आमच्या अनेक शाखा नगर शहरासह महाराष्ट्रात आहेत आमच्या आजोबानी याच चौकातून १९८३ साली व्यवसायाला सुरुवात केली होती याच ठिकाणी ४० वर्षानंतर त्या शाखेबरोबर आज नवीन शाखा सुरु करत आहोत याचा आमच्या परिवाराला खूप आनंद होत आहे राज्यात फ्रेंचाईशी देत असून सर्वत्र एकच क्वालिटी बरोबर हायजिन फूड देत आहोत
महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी
आ जगताप म्हणाले अस्सल मराठी चवीचे काही चटकदार, झणझणीत खायची इच्छा झाली तर नगरकर मारुतीराव मिसळवाल्यांच्या मिसळपुरीचा आनंद घेतात त्याची मिसळ राज्यात अव्वल १०पैकी असल्याचा 'अस्सल चव महाराष्ट्राची' असा किताब त्यांना मराठी वृत्तवाहिनी व प्रकाश कोल्हापुरी मसाले यांच्याकडून मिळाला आहे. मारुतीराव मिसळवाले यांची विलक्षण खमंग मिसळ ही खवय्यांनी नेहमीच नावाजली आहे.ह्या मिसळीचे वैशिष्ट्य असे आहे की,त्यात खास घरगुती मसाले, उत्तम प्रतीचे गहू, मटकी, हळद, लाल मिरची पारखून फरसाण,कोथिंबीर वापरण्यात येते. हेच त्यांच्या आजवरच्या यशाचे गमक आहे.
अहमदनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून सिद्धाराम सालीमठ यांनी स्वीकारला पदभार
अमित खामकर म्हणाले आम्ही मिसळ एका विशिष्ट प्रकारे सादर करतो. आधी कुरकुरीत पालक भजी ठेवली जाते, त्यावर मोड आलेल्या मटकीचा झणझणीत रस्सा घातला जातो व त्यावर बंदी,शेव, बारीक चिरलेला कांदा व घालून सजवली जाते व ही मिसळ गरमागरम पुरी/पावा सोबत बरोबर दिली जाते, ही मिसळ तीन प्रकारात मिळते(कमी तिखट,मध्यम तिखट व झणझणीत तिखट), आमची मिसळ लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडते. शहरातील अनेक मान्यवरांनी,नगरकरांनी व खवय्यांनी भेट देऊन त्यांना शुभेछया दिल्या
पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा