महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याच्या दागिन्यांची चोरी

। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । पुण्याहून नगरला एसटी बसने आलेल्या महिला प्रवाशाच्या पर्समधील सोने असलेली छोटी पर्स कोणीतरी चोरून नेली. ही घटना पुणे बसस्थानक ते माळीवाडा बसस्थानक दरम्यान जाताना लक्षात आली.

डेक्कन कॉलेजच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त मेहेरबाबांची पुस्तके भेट

याबाबत माहिती अशी की संगीता राजकुमार पितळे (वय 60 वर्षे, रा.मु.चिंचपुर ढगे, ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद) या त्यांच्या मुलासह पुणे शिवाजीनगर येथून भूम परंडा येथे गावी जाण्यासाठी नगर येथील पुणे बस स्थानक येथे उतरल्या. तेथून माळीवाडा बस स्थानकाकडे जात असताना त्यांना त्यांच्या पर्सची चेन उघडी दिसली.

पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा 

 त्यांना पर्समध्ये ठेवलेली सोन्याच्या दागिन्यांची छोटी पर्स दिसली नाही. कोणीतरी त्यांच्या बॅगमधून सोन्याच्या दागिन्यांची पर्स आतील 60 हजार रुपये किमतीचा 2 तोळे वजनाचा नेकलेस, 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे 2 तोळे वजनाचे गंठण, 

राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर! 

15 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची 1 सोन्याची अंगठी, 18 हजार रुपये किमतीच्या 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 अंगठया अशा 1 लाख 58 हजार रुपये किमतीच्या ऐवजासह चोरुन नेली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 650 खेळाडूंचा सहभाग  

Post a Comment

Previous Post Next Post