पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा तर शरद पवारांचे कौतुक !


। नवीदिल्ली । दि.09 फेब्रुवारी । लोकसभेतील भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवार (9 फेब्रुवारी) राज्यसभेत काँग्रेस आणि गांधी परिवारावर जोरदार निशाणा साधला. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. 

शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता : मंत्री सुधीर मुनगंटीवार

लोकसभेनंतर राज्यसभेमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. देशात काँग्रेसचं सरकार असताना कशाप्रकारे वेगवेगळ्या राज्यांची सरकारं पाडली गेली, हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे मात्र कौतुक केलं आहे.

सहकार विभागाच्या अडी-अडचणी प्राधान्याने सोडवून विभागाला अधिक सक्षम व बळकट करणार : सहकार मंत्री अतुल सावे

पुढे ते म्हणाले की, मी शरद पवारांना कायमच आदरणीय नेते मानतो. 1980 मध्ये शरद पवारांचं वय 35 - 40 होतं. एक तरुण मुख्यमंत्री महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघाला होता. त्यांचं सरकारही पाडण्यात आलं. आज तेही तिकडे आहेत, असं म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलत असताना शरद पवार सभागृहात उपस्थित होते.

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ 

Post a Comment

Previous Post Next Post