दोन लाख 87 हजाराचे स्मार्ट फोन,स्मार्ट वॉच आणि रोख रक्कम चोरणारे एलसीबीच्या ताब्यात

। अहमदनगर । दि.09 फेब्रुवारी ।  कर्जत तालुक्यातील मोबाईल शॉपीचे पत्रे उचकटुन चोरी करणारे तीन अल्पवयीन मुलांना दोन लाख 87 हजार रुपये किंमतीचे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच व रोख रक्कम अशा मुद्देमालसह एलसीबीने ताब्यात घेतले आहे.

दुचाकी आडवुन दाम्पत्याला लुटणारे जेरबंद

माहिती अशी की, दि.05 फेब्रुवारी 23 रोजी रात्री फिर्यादी शेखर रामदास बनसोडे (वय 29, धंदा मोबाईल शॉपी,रा. श्रीरामनगर,मिरजगांव,ता.कर्जत) यांचे बावडकर कॉम्पप्लेक्स, मिरजगांव, ता. कर्जत येथील श्री.गणेश मोबाईल शॉपीचे छताचे पत्रे व पिओपी उचकटुन मोबाईल शॉपीमध्ये प्रवेश करुन विविध कंपनीचे व 1,86,000/- रु रकमेचे मोबाईल फोन,स्मार्ट वॉच व 1,88,000/- रुपये रोख असा एकुण 3,74,000/- हजार रुपये किंमतीचा माल अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करुन चोरुन नेला होता.

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

याबाबत मिरजगांव,पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन मिरजगांव पोलीस स्टेशन येथे गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,  अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समातंर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

कांद्याला मिळाला इतका भाव

अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ सुनिल चव्हाण,दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार,बबन मखरे,संदीप घोडके,देवेंद्र शेलार,पोना शंकर चौधरी,रवि सोनटक्के, पोकॉ मेघराज कोल्हे व चापोहेकॉ संभाजी कोतकर अशांना बोलावुन घेवुन सदर ना उघड गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.

कार विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

पथक मिरजगांव व कर्जत परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केळसांगवी, ता.आष्टी, जिल्हा बीड येथील काही अल्पवयीन मुलांनी केला असुन आता गेल्यास मिळुन येईल त्यावरुन पोनि/कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन स्थानिक पोलीस व पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

ड्रायव्हरची करामत अद्दल घडवण्यासाठी घरफोडी!

यानंतर पथकाने गायरानवस्ती, केळसांगवी येथील तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेवुन चौकशी करता ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवुन घरा जवळील कोंबड्याचे खुराड्यात ठेवलेले गुन्ह्यातील 1,01,000/- रुपये रोख व 1,86,000/- रुपये किंमतीचे मोबाईल फोन व स्मार्टवॉच असा एकुण 2,87,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल काढुन दिल्याने सर्व मुद्देमाल हस्तगत करुन मिरजगांव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना

पुढील कारवाई मिरजगांव पोलीस स्टेशन करीत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधीकारी नगर शहर विभागाचे आण्णासाहेब जाधव यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बाळासाहेबांची शिवसेनेच्या उप-जिल्हाप्रमुखपदी आनंदराव शेळके 

Post a Comment

Previous Post Next Post