। अहमदनगर । दि.12 फेब्रुवारी । येथील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेचा थरार रंगला होता. अहमदनगर जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 650 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. वयोवर्ष 6, 8, 10, 12 व 14 या वयोगटातील मुला- मुलींसाठी धावणे, लांब उडी, गोळा फेक या क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व : प्रधानमंत्री
या स्पर्धेचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. सुनील जाधव, सचिव दिनेश भालेराव, महात्मा फुले कृषी विद्यापीठचे क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव शैलेश गवळी, एल.बी म्हस्के आदी उपस्थित होते.
राज्यातील सामान्य नागरिकांसाठी ५०० ठिकाणी आपला दवाखाना : मुख्यमंत्री
अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या वर्षी पासून पहिला गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भिंगार हायस्कूलचे रमेश वाघमारे यांना देण्यात आला. तसेच राष्ट्रीय खेळाडू श्रीनिवास कराळे यांना गुणवंत खेळाडू म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घरासमोर लावलेल्या कारची काच फोडून रोकड,लॅपटॉप पळवले
या स्पर्धेला जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, नगर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून रमेश वाघमारे, राहुल काळे, संदीप घावटे, घनश्याम सानप, रावसाहेब मोरकर, विश्वेषा मिस्कीन, प्रतीक दळे, प्रशांत वाळुंज, महेश आनंदकर, अमित चव्हाण, गुलजार शेख, सुयोग शेळके, संतोष हराळ, अनिकेत कोळगे, करण काळे, आनंद काळे यांनी काम पाहिले.