। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी । डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 200 व्या वर्धापन दिनानिमित्त, लायब्ररी हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात डेक्कन कॉलेजला अवतार मेहेरबाबांचे सुंदर चित्र, फोटोफ्रेम आणि बुकशेल्फसह 90 पुस्तके भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला डॉ मेहेरनाथ कलचुरी आणि त्यांचे कुटुंबीय, डॉ. प्रमोद पांडे (कुलगुरू), प्रा. जोशी (प्र-कुलगुरू), डॉ. तृप्ती मोरे (मुख्य ग्रंथपाल)अवतार मेहेर बाबा पूना सेंटरचे सर्व विश्वस्त,डॉली केरवाल (विश्वस्त, AMBPPCT) आणि प्रेमळ बाबा प्रेमी उपस्थित होते.
अवतार मेहेर बाबांची पुस्तके आणि चित्र दान केल्याबद्दल कॉलेजने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले हि पुस्तके आता ग्रंथालयात उपलब्ध आहेत आहे. मोनवानी पब्लिकेशन्स हैदराबाद, कम्पॅनियन बुक्स ,यूके, बेलव्हड बुक्स ,यूएस, शेरियार फाउंडेशन यूएस, एएमबी पूना सेंटर आणि एएमबी बॉम्बे सेंटर, मेहर नजर, अहमदनगर यांनी हि पुस्तके देणगी दिली.
------
पोहरादेवी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर!
जिल्हास्तरीय सब ज्युनिअर अॅथलेटिक्स स्पर्धेत 650 खेळाडूंचा सहभाग
Tags:
Ahmednagar