अत्याचार प्रकरणात आसाराम बापू अडचणीत..

। सूरत । दि.31 जानेवारी 2023 । स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2013 मधील अत्याचार प्रकरणात सत्र न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले आहे.

सत्यजित तांबे यांना आता भाजपच्या 'या' नेत्याची ऑफर 

उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे. गांधीनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालय मंगळवारी सकाळी 11 वाजता शिक्षा सुनावणार आहे. सुनावणी बराच काळ या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू होती. सुरतमधील दोन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी 2013 मध्ये आसाराम बापूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी

2002 ते 2005 दरम्यान आसारामने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. या प्रकरणी न्यायालयाने एकूण 68 जणांचे जबाब नोंदवले होते. या घटनेप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने यापैकी सहा आरोपींना निर्दोष मानले आणि आसारामला दोषी ठरवले.

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर

आसाराम बापू अनेक दिवसांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणात आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायांना आरोपी करण्यात आले होते. या सर्वांची काही काळापूर्वी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. आता त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

पौष्टीक तृणधान्य योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना...

सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना अत्याचार झाल्याचे मुलींनी सांगितले. अहमदाबाद येथील आश्रमात आपल्यावर अनेकदा अत्याचार झाल्याचा आरोप मोठ्या बहिणीने केला होता.

संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान...

जोधपूर न्यायालयाने त्यांना एका वेगळ्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शिक्षा सुनावली होती. 2013 मध्ये त्याने जोधपूरच्या आश्रमात 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post