पीककापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग संपन्न
सर्व यंत्रणांनी मिळून चांगले काम करा : सुहास मापारी
। अहमदनगर । । दि.05 जानेवारी 2023 । जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी, महसूल, जिल्हा परिषद या यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांना पीक कापणी प्रयोग व कृषी गणना प्रशिक्षण कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगाम सन 2022-23 अंतर्गत देण्यात आले.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, एनएसओ मनोज कुमार (पुणे), अन्सार शेख, दिलीप कुलकर्णी आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी म्हणाले की, रब्बी हंगामातील तक्ता नंबर 1 व 2चे काम तिन्ही यंत्रणांतील कर्मचाऱ्यांनी मिळून वेळेत पूर्ण करावे. टीआरए कार्डचे संकलन वेळेत पूर्ण करावे. पीकविमा योजनेचा जास्तीत जास्त प्रचार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. ही केंद्र शासनाची महत्त्वाची बाब असून, दुर्लक्ष न करता सर्व यंत्रणांनी मिळून चांगले काम करावे, असे ते म्हणाले.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील म्हणाले की, रब्बी हंगामातील पीककापणी प्रयोगाचे यंत्रणानिहाय वाटप करून दिले आहे. त्याप्रमाणे तिन्ही यंत्रणांनी मिळून पीककापणी प्रयोगाचे चांगले काम करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी प्रयोगासाठी प्लॉटची मोजमापे यांचे महत्त्वाचे टप्पे, प्रयोग घेण्यासाठीचे ठळक बाबी, क्षेत्रीय कामाबाबतच्या सूचना गाव पातळीवर समिती तयार करणे, गावे निवडण्याची कार्यपद्धती याबाबत सविस्तर विवेचन केले. दिलीप कुलकर्णी यांनी पीक कापणी प्रयोगबाबतचे तांत्रिक मार्गदर्शन केल.
सूत्रसंचालन तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी केले, तर आभार अन्सार शेख यांनी मानले.