। पुणे । दि.29 जानेवारी 2023 । अंधश्रद्धानिर्मूलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आले आहेत. या बागेश्वर बाबांनी आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे
मोदींच्या पोस्टरला काळं फासणाऱ्या तांबेंच्या प्रचारासाठी भाजप सक्रिय झाली..?
आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे कायम अडचणीत आणि तितकेच चर्चेत असलेले बागेश्वर बाबा आता नव्याने बरळले आहेत. त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल आपले आकलीचे तारे तोडले आहेत. बागेश्वर बाबा म्हणतात, तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. आणि त्यामुळे त्यांनी देवदेव करण्याचा निर्णय घेतला.
नगरच्या श्रुती साळवीला सौंदर्यस्पर्धेत उपविजेतेपद
या बाबाच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. बागेश्वर बाबांनी नव्या वादाला तोंड फोडल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, आता वारकरी सांप्रदायही आक्रम भूमिका घेण्याची शक्यता आहे.