। अहमदनगर । दि.13 जानेवारी 2023 । रब्बी हंगामाकरीता पाण्याची गरज असलेल्या शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या असल्याची माहिती खा.डॉ सुजय विखे यांनी दिली.
मुळा लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची लागवड केली आहे. या पिकांना पाण्याची उपलब्धता व्हावी अशी मागणी शेतकरी तसेच पाणी वापर संस्थांनी खा.डॉ. विखे यांना केली होती.
त्यानुसार जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सूचना देवून खा.विखे यांनी आवर्तन सुरू करण्यास सांगितले होते. विभागाच्या या निर्णयाने मोठा दिलासा शेतकर्यांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 10 जानेवारीपासून सुरू होणार्या आवर्तनाचा लाभक्षेत्रातील राहुरी, नेवासे, शेवगाव व पाथर्डी या तालुक्यातील अंदाजे 25 हजार हेक्टर क्षेत्रातील गहू-कांदा-मका या पिकांना लाभ होण्याच्यादृष्टीने आवर्तनाचे 35 दिवसांचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लाभधारक शेतकर्यांची पाण्याची निकड लक्षात घेवून सध्या सुरू असलेल्या बिगर सिंचन आवर्तनाला जोडूनच रब्बीचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या असल्याचे खा.डॉ विखे यांनी सांगितले.
Tags:
Breaking