नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक : मतदारांच्या तक्रारीच्या निवारणासाठी मतदार सहायता कक्षाची स्थापना

। अहमदनगर । दि.30 जानेवारी 2023 ।  नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ विधान परीषद व्दिवार्षिक निवडणूक 2023 साठी दि. 30 जानेवारी, 2023 रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदार यादी, मतदान केंद्राच्या बाबतीत अडचणीचे निराकरण करण्यासाठी मतदार सहायता कक्ष स्थापन करण्यात आला असून कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2347623 असा आहे.

या कक्षामध्ये निवडणूक शाखेच्या अव्वल कारकून श्रीमती छाया काळे व महसूल सहाय्यक भुषण मेढे या कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असून   मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याच्या सूचनाही या कर्मचार्‍यांना देण्यात आल्या असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-------

शहर बँक निवडणुकीत मतदारांचा निरुत्साह...

संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान...

मटका अड्ड्यावर छापा... 

Post a Comment

Previous Post Next Post