। नाशिक । दि.16 जानेवारी 2023 । नाशिक विभागातील पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेनेने पाठिंबा जाहीर केलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील नॉट रिचेबल आहेत. विशेष म्हणजे पदवीधर निवडणुकीमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच पाटील नॉट रिचेबल असल्याने त्या उमेदवारी मागे घेणार अशी जोरदार चर्चा नाशिकमध्ये सुरु झाली आहे.
डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या मात्र त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या आज दुपारपर्यंत अर्ज मागे घेतील अशी जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी महाविकास आघाडीच्या नेत्यांची या निवडणुकीसाठी पाटील यांना पाठींबा देण्याच्या मुद्द्यावरुन बैठक आयोजित करण्यात आल्याचंही वृत्त आहे. मात्र पाटील यांनी माघार घेतल्यास हा ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरु शकतो.
नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी
शुभांगी पाटील यांच्या माघारीची चर्चा असतानाच त्या आज सकाळपासूनच नॉट रिचेबल आहे. सकाळपासनच पाटील यांच्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही. भाजपाचे वजनदार नेते व संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन कालपासून शुभांगी पाटील यांच्या माघारीच्या प्रक्रियेसाठी नाशिक मध्ये तळ ठोकून असल्याची माहिती समोर येत आहे.
गूगलने दखल घेतली पण सरकारने नाही! : संभाजीराजे
आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून काँग्रेसच्या पक्ष आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले सत्यजित तांबे हे भाजपा पुरस्कृत उमेदवार ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश ईटकेलवारही नॉट रिचेबल असल्याने राष्ट्रवादीचं टेन्शन वाढलं आहे. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.