डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन


। मुंबई । दि.15 जानेवारी 2023 । डॉ.सुधीर तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलाय. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्यानं राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला दिली होती. तसेच कारवाईचीही मागणी केली होती. यावरुन राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांच्या आदेशानुसार सुधीर तांबे यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची काँग्रेसकडून चौकशी केली जाणार असून, तोपर्यंत सुधीर तांबे निलंबित असणार आहे, अशी माहिती पत्रकाद्वारे काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

------

गूगलने दखल घेतली पण सरकारने नाही! : संभाजीराजे 

कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी

रब्बी हंगामासाठी मुळातून आवर्तन सुटणार : खा.डॉ सुजय विखे 

Post a Comment

Previous Post Next Post