। अहमदनगर । । दि.03 जानेवारी 2023 । ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण शिक्षण व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योगरत्न गौरव पुरस्कार नगरमधील उद्योजक संजय माधवराव चव्हाण यांना नुकताच पालघर येथे प्रदान करण्यात आला.
उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. वाडा (जि. पालघर) येथील पी. जे. हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. वीरेंद्र भोईर यांचे हस्ते प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह देऊन संजय चव्हाण यांना गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाडा पंचायत समितीच्या सभापती सौ. अस्मिता लहांगे, उपसभापती जगदीश पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा मंदाताई कांबळे, कोषाध्यक्ष सौ. नंदा बोरकर, सहसचिव वैभव भानुशाली, संजना गायकवाड, समीर आठरे, तुषार भोईर, अरुण बेणके, सविता मोढवे,
नंदा डेरे, संगीता घेगडे, अनिता साळवे, विक्रांत कदम, चंदन बनसोडे, योगित येवले, सूर्यकांत कदम आदी मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांकडून चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले.
------
💢 चोर्या व घरफोड्यांचा गांभीर्याने तपास नाही : संभाजी ब्रिगेडचा दावा, पोलिसांना निवेदन
💢 दारु पिऊन वाहन चालविणे भोवले; चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
💢 अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित-शिक्षक शिक्षकेतर सेवक कल्याण निधीच्या चेअरमनपदी प्रा. संगिता निंबाळकर तर सचिवपदी प्रा. रामेश्वर दुसुंगे