चिनी मांज्याची विक्री करणार्यावर कठोर कारवाइ करावी : जाणीव फाउंडेशन


। अहमदनगर । । दि.05 जानेवारी 2023 । मकर संक्रातीचा सण जवळ आल्याने पतंग व मांज्याच्या विक्रीने जोर पकडला आहे. आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छीतो कि, चायना मांजावर बन्दी असतान्नाही त्याची सर्रास विक्री केली जाते. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकान्ना अनेक अपघातान्ना सामोरे जावे लागत आहे. अजून सन दूर असला तरी रोज जिल्ह्या भरात किमान 4-5 घटना घडत आहेत. त्याचे प्रमाण येत्या काही दिवसात त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. चायना मांजा पायात व पंखात अडकून अनेक पक्षीही प्राणान्ना मुकत आहेत.     

त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, वाहन चालक व पक्ष्यांच्या जिवाशी खेळणारा चायना मांजा विक्रीचा धंदा कठोर कायदेशीर कारवाई करुन बन्द केला पाहिजे.

बहुतेक महिला व जेष्ठ नागरिकांना छोट्या छोट्या कामांसाठी, थोड्या अंतरासाठी गाडी घेऊन बाहेर पडावे लागते. एवढ्या थोड्या अंतरातही चायना मांज्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे चायना मांजा विक्रेत्यांवर त्वरीत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जाणीव फाऊंडेशनच्या वतीने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यान्ना देण्यात आले. त्यांनी संबन्धितावर कठोर कारवाइ केली जाइल असे आश्वासन दिले. 

यावेळी चिनी मांज्यामुळे मान कापलेले भूपेंद्र रासने व सुनील कोरडे   यांच्यासह जाणीव फाऊंडेशनचे सुवर्णकार महेंद्र नांदुरकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, इंजि. बाळासाहेब पवार, छायाचित्रकार राहुल जोशी, ॲड. विक्रम वाडेकर, इंजि. कैलाश दिघे, विकास गायकवाड व सतीश शिंदे इ. उपस्थित होते.

----------

पीककापणी प्रयोग प्रशिक्षण वर्ग संपन्न 

अहमदनगर प्रेस क्लबचे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर

कोयता घेवून फिरणारा युवक पोलिसांच्या ताब्यात 

Post a Comment

Previous Post Next Post