मोदींच्या पोस्टरला काळं फासणाऱ्या तांबेंच्या प्रचारासाठी भाजप सक्रिय झाली.. "ते" भाजपचेच, पदवीधर गद्दारांना त्यांची जागा दाखवतील : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे

। अहमदनगर । दि.29 जानेवारी 2023 ।  ज्या सत्यजित तांबेंनी भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासलं आज त्याच तांबेंच्या प्रचाराची वेळ भाजप कार्यकर्त्यांवर आली. विखे यांनी आदेश दिल्याचे भाजपचेच कार्यकर्ते आता जाहीररित्या सांगायला लागले आहेत. सोशल मीडिया स्टेटस ठेवत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः ऑनलाईन बैठकीत तसे आदेश दिले आहेत. त्यामुळे तांबे यांची अपक्ष उमेदवारी ही कधी काँग्रेसची नव्हतीच. त्यांनी गद्दारी केली आहे. ते भाजपचेच आहेत. पदवीधर अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवतील असे वक्तव्य काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील अपक्ष उमेदवार प्रा. चिंधे यांनी घेतली खा. विखेंची भेट!

नगर शहरासह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना त्यांनी ऑनलाईन बैठक घेत महत्वपूर्ण सूचना केल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नियोजनाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट पदवीधर मतदारांशी संपर्क करण्याची जोरदार मोहीम शेवटच्या टप्प्यात चालवली आहे. काळे म्हणाले की, तांबे किती खोटे बोलतात हे आता पदवीधरांना समजले आहे. अगदी कालपर्यंत सुद्धा ते मी काँग्रेसचाच आहे. काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला आहे, अशा वल्गना करत होते. मात्र आता तांबे यांचे पितळ उघडे पडले आहे. जर ते काँग्रेसचे आहेत तर त्यांना भाजपचा पाठिंबा चालतो कसा ? ते भाजपच्या शहर जिल्हाध्यक्ष यांना काल भेटायला गेले कशाला ? असा सवाल काळे यांनी यावेळी केला आहे. 

शुभांगीताई पाटील यांच्या विजयाचा शिवसेनेचा निर्धार : विक्रम राठोड

पदवीधर मतदार हा सुशिक्षित मतदार आहे. त्याला हे वेडं समजत आहेत. योग्य निर्णय घेण्याची कुवत असणाऱ्या मतदारांना वेड्यात काढण्याचा त्यांचा प्रयत्न पदवीधर स्वतःच निवडणूक हातात घेऊन असफल करत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तांबे यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी देव असणाऱ्या मोदींना काळं फासल आहे, आता हे भाजप कार्यकर्ते कस विसरणार आहेत ? भाजप कार्यकर्त्यांसाठी मोदी मोठे की तांबे मोठे ? असा सवाल यावेळी काळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केला आहे. 

नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : डॉ.निपुण विनायक निवडणूक निरीक्षक

भाजपच्या या भूमिकेमुळे आणि तांबे यांनी भाजपच्या घेतलेल्या पाठिंबामुळे धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आणि भाजप विरोधी विचारांच्या मतदारांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. त्यातच मोदी यांना काळ फासणाऱ्या तांब्यांना भाजपने दिलेला पाठिंबा यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळत आहे. एकूणच तांबे ना काँग्रेसचे ना भाजपचे, अशी त्यांची ना घर का ना घाट का अशी अवस्था होते की काय अशी पदवीधर मतदारसंघांमध्ये या निमित्ताने चर्चा रंगू लागली आहे. 

डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

Post a Comment

Previous Post Next Post