सिन्नर शिर्डी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात

 

। नाशिक ।  दि.14 जानेवारी 2023 । सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावाजवळ पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. नाशिकच नव्हे तर ठाणे जिल्ह्याला हादरवणारा हा भीषण अपघात होता.

खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा भयानक अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर सिन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

अपघात एवढा भीषण होता कि बसचा चुराडा झाला आहे. एका बाजूने बसचा सांगाडाच बाहेर पडल्याचे चित्र घटनास्थळावर दिसून आले. एकूणच नाशिक शहरासह जिल्ह्यातील आपघातांचे सत्र सुरूच असून यंदाच्या वर्षांतील सर्वात भयानक अपघात म्हणावा लागणार आहे.  

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिलेत.

-----

पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर व्हावे : आ.अमोल मिटकरी 

लोककल्याणकारी राजा घडविणार्‍या राजमाता जिजाऊंना अभिवादन 

नाशिक पदवीधरसाठी काँग्रेस महाविकास आघाडीने पुरस्कृत करावे...

Post a Comment

Previous Post Next Post