अतिक्रमणांवर कारवाई संदर्भात आयुक्तांची सोमवारी बैठक

। अहमदनगर । दि. 21 जानेवारी ।  शहरातील प्रमुख रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर तसेच रस्त्यालगतच्या इमारतींमध्ये घर व गाळ्यासमोर शेड मारुन करण्यात आलेल्या 270 अतिक्रम णांवर मार्किंग करण्यात आले आहे. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. 

राज चेंबर येथे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई

कारवाईच्या नियोजनासाठी सोमवारी 23 जानेवारी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत सर्व प्रभाग अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचार्‍यांची एकत्रित बैठक होणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अभियंता रोहिदास सातपुते यांनी सांगितले.

महावितरणमधून बोलतो, असे सांगून फसवणुक

आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अतिक्रमणांवर मार्किंगचे आदेश दिले होते. चारही प्रभाग समिती कार्यालयासाठी चार स्वतंत्र पथके नियुक्त केली होती. आत्तापर्यंत सावेडी प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 79, माळीवाडा-शहर प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 38, बुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत 81 अशा 270 अतिक्रमणांवर मार्किंग करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात 29 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

या अतिक्रमणांवर स्वतंत्र मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोमवारी कारवाई संदर्भात बैठक होणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

हातात हात घालून पाच तोळ्याचे ब्रेसलेट पळविले 

Post a Comment

Previous Post Next Post