। अहमदनगर । दि.07 जानेवारी 2023 । येथील यतिमखाना संस्थेतील तीन मुले भोजनसाठी न आल्याने शोध घेऊन आढळून आले नव्हते. तिन्ही मुले नातेवाईकांकडे सुखरूप आढळून आले आहेत.
यतिमखाना संस्थेतील तीन मुले बुधवारी (ता.४) भोजनसाठी न आल्याने त्यांचा संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी शोध घेतला. संस्थेचे अधीक्षक शेख गुफरान रफिक यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात हरविल्याची फिर्याद दिली.
त्यांच्या पालकांशी संपर्क करून ही मुले घरी आले आहे का याची माहिती घेतली असता ते घरी परत आले नव्हते. परंतु सदर मुलांचे शोध घेण्यासाठी पालकांच्या मदतीने संस्थेचे कर्मचारी यांनी शोध घेतला असता ही तिन्ही मुले नातेवाईकांकडे सुखरुप मिळुन आलेली आहेत.
ही घटना मुलांनी न सांगता नातेवाईकांकडे गेल्याने घडली होती. संस्थेच्या वतीने मुलांच्या सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
-------
राजकारणातील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर
पोलिस भरती : तिसर्या दिवशी 675 उमेदवारांची मैदानी चाचणीला हजेरी
शेअर गुंतवणूकीच्या नावाखाली 3 कोटीची फसवणूक : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल