। अहमदनगर । दि. 23 जानेवारी । नगर शहर व भिंगार येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढुन चोरी करणार्या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. रियाज फैय्याज इराणी (वय 42 रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख 52 हजार रूपये किंमतीचे 6.4 तोळे (64 ग्रॅम) सोन्याचे दागिणे जप्त केले आहे.
शुभांगीताई पाटील यांच्या विजयाचा शिवसेनेचा निर्धार : विक्रम राठोड
दरम्यान त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एका दाखल गुन्ह्याची कबूली दिली आहे. 15 जानेवारी, 2023 रोजी माया किरणकुमार वनारसे (वय 40, रा. सुर्यानगर, तपोवन रोड) या नगर-औरंगाबाद रोडवरील फिरोदिया वृध्दाश्रमासमोरून जात असताना पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओरबडून नेले होते. सदर घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुचाकी झाडावर आदळून अपघात ; दोघांचा मृत्यू
नगर शहरासह उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान एक इसम चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकास कळवुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
तीन गावठी पिस्तुलासह आरोपी ताब्यात
नमुद आदेशान्वये पथक तात्काळ शिवाजी चौक येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना एक संशयीत इसम पोलीस पथकास पाहुण पळुन जावु लागला. पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव रियाज फैय्याज इराणी (वय 42, रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये अहमदनगर शहर परिसरात साथीदारासह सोनसाखळी चोरी केलेल्याची कबूली दिली.