वृध्द व्यक्तीचे घर फोडून संसार उपयोगी वस्तु व रोख रक्कम लांबवली

। अहमदनगर । दि.23 जानेवारी 2023 ।  घर बंद करून मुलाकडे पुणे येथे गेलेल्या वृध्द व्यक्तीचे घर चोरट्यांनी फोडले. घरातील संसार उपयोगी साहित्य, रोख रक्कम असा 22 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. 17 ऑक्टोबर, 2022 ते 20 जानेवारी, 2023 दरम्यान सावेडी उपनगरातील निर्मलनगर मध्ये ही घटना घडली.

भिंगार परिसरात चेन स्नॅचिंग करणारा सराईत जेरबंद 

या प्रकरणी 22 जानेवारी रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश प्रभाकर परांजपे (वय 60 रा. निर्मलनगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. अविनाश परांजपे यांचा मुलगा पुणे येथे राहतो. ते 17 ऑक्टोबरला त्यांचे घर बंद करून पुणे येथे मुलाकडे गेले होते. 

शुभांगीताई पाटील यांच्या विजयाचा शिवसेनेचा निर्धार : विक्रम राठोड 

तेथून ते 20 जानेवारीला घरी निर्मलनगर येथे आले असता त्यांना घर फोडून संसार उपयोगी वस्तू व रोख चोरीला गेल्याचे दिसून आले. त्यांनी तोफखाना पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक दीपक जाधव अधिक तपास करीत आहेत.

महावितरणमधून बोलतो, असे सांगून फसवणुक 

Post a Comment

Previous Post Next Post