आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नूतन वर्षानिमित्त व्यायामाचा संकल्प करावा : आयुक्त पंकज जावळे

पटवर्धन चौक येथील ‘शिववरद जिम’ नूतनीकरणाचे उद्घाटन संपन्न

आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नूतन वर्षानिमित्त व्यायामाचा संकल्प करावा : आयुक्त पंकज जावळे

। अहमदनगर । । दि.03 जानेवारी 2023 । नूतन वर्षी प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतो. यंदाच्या वर्षी सर्वांनी आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करण्याचा संकल्प करावा. आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी शिववरद जिम’ नक्कीच सहकार्य करेल. नववर्षानिमित्त सर्वांसाठी ही चांगली भेट असून, व्यायामामुळे आपले शरीर सुदृढ होतेच परंतु आपले व्यक्तीमत्वही खुलून दिसत असते. त्यामुळे प्रत्येकाने व्यायाम करणे गरजेचे आहे. मोबाईलमध्ये अडकलेल्या युवकांसह सर्वांनाच व्यायायाची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्याचे काम शिववरद जिम’च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी केले.

पटवर्धन चौक येथील ‘शिववरद जिम’ नूतनीकरणाचे उद्घाटन श्रीमती राधिका विश्वास आव्हाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मनपा आयुक्त पंकज जावळे, जयंत गायकवाड, माजी नगरसेवक किशोर डागवाले, पो.नि.संपतराव शिंदे, अजय साळवे, संजय कांबळे, गोरख डागवले, जिमचे प्रमुख हनीफ शेख,  रोहित आव्हाड, अभिषेक आव्हाड, मृणाल पाखरे  आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ‘शिववरद जिम’चे संचालक  रोहित आव्हाड, म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या या जिममध्ये आता नव्याने आधुनिक उपकरणे येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तज्ञ प्रशिक्षक उपलब्ध असल्याने तंत्रशुद्ध पद्धतीने व्यायाम या ठिकाणी करता येणार आहे. प्रत्येक वयोगटासाठी सोयी-सुविधा या ठिकाणी असणार आहेत. व्यायामाचा परिपूर्ण आनंद व फायदा या ठिकाणी मिळणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी किशोर डागवाले, जयंत गायकवाड, पो.नि.संपतराव शिंदे आदिंनी मनोगतातून ‘शिववरद जिम’च्या नुतणीकरणास आपल्या मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमास रोहन डागवाले, नितिन डागवाले, पप्पू इनामदार, विलास घायतडक, आनंद भोसले, आप्पाराव भोसले, सहदेव खंडागळे, बाजीराव भिंगारदिवे, अक्षय भिंगारदिवे, मुबारक शेख, प्रवीण चाबुकस्वार, संजय जगताप, योगेश झुंगे, सागर कदम, गुलाम शेख, जय कदम, नितीन कदम, दादा पेटारे, आकाश निर्भवणे, अनिल गायकवाड, बाबू पाचारणे आदि उपस्थित होते.

प्रास्तविकात हनिफ शेख यांनी जिमची माहिती दिली. शेवटी अभिषेक आव्हाड यांनी सर्वांचे आभार मानले. 

------

उद्योजक संजय चव्हाण यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

दारु पिऊन वाहन चालविणे भोवले; चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल 

चोर्‍या व घरफोड्यांचा गांभीर्याने तपास नाही : संभाजी ब्रिगेडचा दावा, पोलिसांना निवेदन 

 

Post a Comment

Previous Post Next Post