क्रीडापटू शहराचा नावलौकिक वाढवत आहेत : किरण काळे

क्रीडापटू शहराचा नावलौकिक वाढवत आहेत : किरण काळे

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक तायक्वांदो स्पर्धेतील खेळाडूंचा काँग्रेसच्या वतीने सत्कार


। अहमदनगर । । दि.16 जानेवारी 2023 ।  अहमदनगरचा क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक आहे मर्यादित क्रीडाविषयक सुविधा असून देखील स्वतःच्या हिमतीवर क्रीडा प्रशिक्षक शिक्षक आणि क्रीडापटू हे मेहनत घेऊन आपला खेळ अधिकाधिक उत्तम करण्यासाठी सराव करत असतात खरंतर त्यांना शासन स्तरावर मोठी मदत मिळण्याची गरज आहे मात्र असे असले तरी देखील ते मिळवत असलेल्या दैदिप्यमान यशामुळे शहराचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक तायक्वांदो स्पर्धेतील कांस्यपदक विजेते युवराज लोखंडे व अनिल तोडकर यांचा शहर जिल्हा युवक काँग्रेस व क्रीडा काँग्रेस विभागाच्या पुढाकारातून काळे यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी युवक व क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले नारायण कराळे, पंच म्हणून काम पाहिलेले योगेश बिचितकर, प्रिया शिंदे, गणेश वंजारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात २२ वर्षानंतर पुन्हा चालू झालेल्या मिनी ऑलम्पिक या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदो या खेळामध्ये ५ खेळाडू २ पंच, १प्रशिक्षक , १ व्यवस्थापक असा अहमदनगर जिल्ह्यातील ९ जणांचा चमु सहभागी झाला होता.महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येत असून राज्यातील खेळाडू, संघटक मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ही स्पर्धा संजीवनी ठरली आहे. स्पर्धेमध्ये ३९ क्रीडा प्रकारचा समावेश असून यामध्ये ७५०० खेळाडू, अधिकारी एकाच वेळेस सहभागी झाले आहेत. १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे राज्यात क्रीडामय वातावरण तयार झाले आहे.

या स्पर्धेत तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगर या अधिकृत संघटनेच्या पाच खेळाडू मयुर अडागळे, शिल्पा पगारे, सुरज कोलते, अनिल तोडकर, युवराज लोखंडे, व्यवस्थापक, पंच सहभागी झाले होते. त्यात युवराज लोखंडे व अनिल तोडकर यांनी कांस्य पदक पटकावले. प्रवीण गीते म्हणाले की, काँग्रेस क्रीडा विभाग नियमित क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडापटूंसाठी काम करत असतो. त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे, त्यांना अडीअडचणीत मदत करणे, त्यांच्या क्रीडा विषयक समस्या सोडवणे यासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे.
 
या सर्वांचे इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष व महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे,महासचिव संदिप ओंबासे, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफार पठाण , टेक्निकल डायरेक्टर तुषार आवटे,तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगरचे सचिव घनश्याम सानप सर, सहसचिव दिनेश गवळी आदींनी या चमूचे अभिनंदन केले आहे.

------

📌 नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी 

📌 गूगलने दखल घेतली पण सरकारने नाही! : संभाजीराजे

📌 धनगर समाज सेवा संघाचा नगरला वधू-वर मेळावा 

Post a Comment

Previous Post Next Post