। मुंबई । दि.11 जानेवारी 2023 । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर बुधवारी सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने छापा टाकला. मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला आहे.
ईडीच्या अधिकार्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीचे जवळपास 20 अधिकारी आज सकाळी सहा वाजता हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते.
या अधिकार्यांकडून हसन मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील 100 कोटीच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी करण्यात आलेली छापेमापी ही या आरोपांशी निगडीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरावर ईडीची छापेमारी सुरू आहे. आधी माजी मंत्री अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा नेता ईडीच्या रडारवर आहे.
-------
भांडणात मित्राला मदत करणार्याच्या खुनाचा प्रयत्न
दारू पाजण्यास नकार दिल्याने तरूणावर हल्ला
रत्नाकर ठाणगे यांना दिव्यांग सन्मान महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित