। कोल्हापूर । दि.15 जानेवारी 2023 । 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. या निमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे.
मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! असे संभाजीराजे यांनी म्हंटले आहे. यावर सरकार काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सोशल मिडीयावर संभाजीराजे यांनी म्हंटेले आहे की, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणार्या खेळाडूस सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत असे ते म्हणाल आहेत.
-----
💥 कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी
💥 पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर व्हावे : आ.अमोल मिटकरी
💥 लोककल्याणकारी राजा घडविणार्या राजमाता जिजाऊंना अभिवादन
.