। मुंबई । दि.31 जानेवारी 2023 । नाशिक विभाग पदवीधरांची निवडणून जाहीर झाल्यापासून राजकय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडत होत्या. आता राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांचे मतदान पार पडले आहे. पाच जागांपैकी सर्वाधिक चर्चा झाली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीबाबत. भाजपने सस्पेन्स कायम ठेवला.
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर
नाशिकमध्ये काँग्रेसमध्ये तांबे पितापुत्रावरून कलगीतुरा चांगालच रंगाला असल्याचे पाहिला मिळाले. महाविकास आघाडीला ऐनवेळी आपला उमेदवार बदलावा लागला. शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या तर सत्यजित तांबे भाजप अन् शिंदे गटाचे उमेदवार होते का? हे शेवटपर्यंत जाहीर झाले नाही.
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी जय्यत तयारी
मात्र, आता निवडणुकीचा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केल्याचे मंगळवारी सांगितले. त्यामुळे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु, असेही त्यांनी सांगितले.
Tags:
Breaking