। अहमदनगर । दि.30 जानेवारी 2023 । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांचे हात बळकटीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नधान्य प्रक्रिया योजनेंतर्गत प्रयत्न केले जात आहेत. पौष्टीक तृणधान्य योजना केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत तृणधान्यांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र शासनाने पाऊल उचलले आहे. ज्वारीला गतवैभव प्राप्त होईल, असे प्रतिपादन राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले.
संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य अंतर्गत इसळक येथे घेण्यात आलेल्या ज्वारीच्या प्रात्यक्षिक प्लॉटला राज्य कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पद्मश्री डॉ. पोपटराव पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, जि. प. उपाध्यक्ष रावसाहेब शेळके, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, ‘आत्मा'चे कृषी उपसंचालक राजाराम गायकवाड, खारेकर्जुनेचे उपसरपंच अंकुश शेळके, जि. प. कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र माळी, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, जालिंदर गांगर्डे, इसळकच्या सरपंच छाया गेरंगे,
नगरच्या श्रुती साळवीला सौंदर्यस्पर्धेत उपविजेतेपद
चेअरमन भाऊसाहेब गायकवाड, बाळासाहेब कोतकर, बाळासाहेब लामखडे, शेतकरी मारुती गायकवाड, रामदास गायकवाड, पोपटराव गारगे, संतोष गेरंगे, विलास निमसे, समीर पटेल, राजू सय्यद, सुनील पादीर, जनार्दन शेळके, कैलास लांडे, अजय लामखडे, बाबासाहेब लामखडे, सागर कोतकर, रोहित कांबळे, भानुदास कोतकर, बाळासाहेब कराळे, श्यामराव गेरंगे, अशोक कोरडे, संतोष जाजगे आदी उपस्थित होते.
लग्नात कॅमेरा चोरणारा नगर तालुका पोलिसांनी केला गजाआड
श्री. चव्हाण पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगासाठी पुढे यायला हवे. मजुराअभावी ज्वारीचे क्षेत्र घटत आहे. ज्वारी आरोग्यासाठी लाभदायक आहे. ज्वारीवर प्रक्रिया करून अनेक उद्योग सुरू ठेवता येतात. महिलांना यापासून चांगला फायदा मिळू शकतो. शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगासाठी पुढे यायला हवे. प्रक्रिया उद्योग वाढले, तर महिला शेतकऱ्यांच्या हाताला अधिक काम मिळेल. कमी पाण्यात येणारे ज्वारीचे पीक आहे. रेशन दुकानावर भरड धान्य देण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
महाराष्ट्राला तीन ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर
पोपटराव पवार म्हणाले की, जोपर्यंत भारत सरकार रेशन दुकानावर भरड धान्य देत नाही, तोपर्यंत तृणधान्यांना बाजारभाव मिळणार नाही. रेशन दुकानावर भरड धान्य चालू केल्यास शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळेल. वाढत्या दुधाच्या भेसळीमुळे प्रत्येकजण पशुपालन करीत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठीही ज्वारीचा ताटांचा उपयोग होतो, असे ते म्हणाले.
साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य
शिवाजीराव जगताप यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टीक तृणधान्य अंतर्गत इसळक येथील मारुती गायकवाड यांना ज्वारीचा प्रात्यक्षिक प्लॉट देण्यात आला असून, त्यांनी यासाठी जमिनीची योग्य निवड केली. पेरणीनंतर ओलावा, अन्न द्रव्य व्यवस्थापन करून पीक संरक्षण केल्याचे ते म्हणाले.
भिंगार परिसरात चेन स्नॅचिंग करणारा सराईत जेरबंद
यावेळी रावासाहेब शेळके, शेतकरी मारुती गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मेहेत्रे यांनी केले, तर आभार विजय सोमवंशी यांनी मानले.