विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी करा : सपोनि रणशेवरे
स्नेहबंध फौंडेशन व सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
। अहमदनगर । दि.12 जानेवारी 2023 । आजच्या युगात मोबाइल व इंटरनेट प्रत्येकाची गरज बनली आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. त्यातूनच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर कमी गरजेचे आहे, असे प्रतिपादन अहमदनगर सायबर सेलचे पोलीस उप-निरीक्षक सचिन रनशेवरे यांनी केले.
डॉ. ना. ज. पाऊलबुधे माध्यमिक विद्यालयात स्नेहबंध सोशल फौंडेशन व सायबर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर क्राइम वर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, मुख्याध्यापक भरत बिडवे, महादेव आमले, रंगनाथ वाघ, दीपक परदेशी, महेंद्र थिटे, राजेंद्र मोरे, वैशाली शिर्के, जयश्री केदार, आशा गावडे आदी उपस्थित होते.
रनशेवरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करतांना आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच विद्यार्थिनींनी टवाळखोर मुले त्रास देत असतील तर ११२ ला कॉल करावा. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी अनेक उपक्रम राबवल्याबद्दल दीपक परदेशी यांनी कौतुक केले.
-------
हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीची छापेमारी
सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या खोडसळ : किरण काळे
Tags:
Breaking