लोककल्याणकारी राजा घडविणार्या राजमाता जिजाऊंना अभिवादन
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी
। अहमदनगर । दि.13 जानेवारी 2023 । राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने आज जिजाऊंना पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना उद्योजक राजेंद्र ससे म्हणाले की, 12 जानेवारी 1598 हा दिवस स्वराज्याची नवी पहाट घेवुन उगवला, कन्या प्राप्तीचे स्वप्न साकार होणार्या याघटनेने आनंदित होऊन राजे लखुजी जाधवांनी हत्तीवरुन साखर वाटली. 1610 ला शहाजी राजे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. स्वराज्य संकल्पक शहाजी भोसले आणि जिजाऊ माँ साहेब यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पुर्ण केले. कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्यावर मानवतेचे संस्कार करुन लोककल्याणकारी राजा बनविणार्या राजमाता जिजाऊंना आज आम्ही अभिवादन करुन समाज उन्नतीचे कार्य हाती घेतले आहे.
यावेळी अहमदनगर येथील जिजाऊ प्रतिष्ठानचे दत्ता साठे, अतुल लहारे, पप्पु गिते, किशोर मरकड, सुनिल जरे, उदय अनभुले, सतिष इंगळे, राजेंद्र कराळे, श्रीपाद दगडे, हेमंत मुळे, अशोक वारकड, बबनराव सुपेकर, श्री.पवार, अमोल रोडे, महेश घावटे, रेवनाथ काळे, अजय लांगोरे, प्रशांत नांगरे, विशाल म्हस्के, गजानन भांडवलकर, महेश काळे, दिगंबर भोसले, वैभव शिंदे आदीसह मान्यावर यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर उद्योजक फॉर्मचे प्रकाशन
अहमदनगर येथील उद्योजक डायरीसाठी राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंती निमित्त उद्योजक जोडो अभियानाची सुरवात करण्यात आली असून यासाठी उद्योजकांनी, व्यावसायकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आपल्या व्यवसायाची तसेच उद्योगाची माहिती देऊन उद्योग-व्यवसायाला चालना कशी देता येईल यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिष्ठानचे सदस्य श्रीपाद दगडे यांनी यावेळी सांगितले.