। अहमदनगर । दि.13 जानेवारी 2023 । सीटी बसने धडक दिल्याने जखमी झालेल्या तरुणीवर नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिचा शुक्रवारी मृत्यू झाला. रविना विठ्ठल सुद्रिक (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा, हल्ली मुक्काम केडगाव) असे मुलीचे नाव आहे.
मुलीचे वडील विठ्ठल बाळकृष्ण सुद्रिक (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी बस चालकाविरोधात फिर्याद दिली. रविना शहरातील एका खासगी रुणालयात नोकरीस असल्याने ती केडगाव येथे वास्तव्यास होती.
सोमवारी (दि. ९) सकाळी कामावर येण्यास निघाली होती. ती सीटी बसने प्रेमदान चौकात आली. बसमधून उतरुन रुग्णालयाकडे जात असताना ज्या बसमधून ती आली त्याच बसची तिला पाठीमागून धडक बसल्याने ती जखमी झाली.
------
सिन्नर शिर्डी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात
Tags:
Breaking