। अहमदनगर । । दि.03 जानेवारी 2023 । 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या पोर्शभूमीवर पोलिसांकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी सुरु असून दारु पिऊन वाहन चालविणार्यांवर कारवाई केली जात आहे. चौघांवर वेगवेगळ्या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये सोहेल गुलाब शेख (वय 23, रा. काटवन खंडोबा रोड, अहमदनगर), विशाल मुकेश गोंंधळे (वय 38, रा. ख्रिस्त गल्ली, अहमदनगर), शशिकपूर भगवान सिंग (वय 36, रा. डिपेंन्डर सेफ्टी शुज, एल 69, रेणुकामाता मंदिराजवळ, नागापूर) व संदेश शशिकांत भिंगारदिवे (वय 28, रा. घास गल्ली, भिंगार) यांचा त्यात समावेश आहे.
30 डिसेंबरला रात्री 8 ते 11 दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार, पोलिस नाईक बापूसाहेब गोरे, कॉन्स्टेबल दीपक कैतके, पोलिस नाईक मुकुंद दुधाळ, कॉन्स्टेबल श्रीकांत खताडे व याकुब सय्यद यांना इम्पिरियल चौकात नाकाबंदी दरम्यान रात्री अॅक्सेस स्कुटी (एमएच 16, सीएक्स 0428) या गाडीवरील चालक सोहेल गुलाब शेख मद्य सेवन करुन गाडी चालवत असल्याचा संशय आला.
त्यास थांबवले असता मद्य सेवनाचा वास आला. त्यानुसार रवींद्र टकले यांच्या फिर्यादीवरुन सोहेल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अॅक्टीव्हा स्कुटी (एमएच 16 एके 25) या गाडीवरील चालक विशाल मुकेश गोंधळे मद्य सेवन करुन गाडी चालविताना आढळला.
या प्रकरणी बापूसाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. ज्युपिटर (युपी 80 एफएच 2536) गाडीवरील चालक शशिकपूर भगवान सिंग याने मद्यसेवन केलेले आढळले. त्यांच्यावर श्रीकांत खताडे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला.
तर, डिस्कव्हर मोटार सायकल (एमएच 17 एएल 1170) या गाडीवरील चालक संदेश शशिकांत भिंगारदिवे मद्य सेवन करुन गाडी चालवत होता. दीपक कैतके यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------
💥 नगरच्या पुणे बसस्थानकावर युवतीची सोन्याची चेन लांबवली
💥 औरंगाबाद शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती
💥 जन्म व मृत्यू नोंदणी व दाखले चारही प्रभाग कार्यालयांमार्फत वितरित करण्याचा निर्णय
Tags:
Breaking