। अहमदनगर । दि.04 जानेवारी 2023 । राज्यातील वीज कर्मचारी महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून तीन दिवस संपावर गेल्याने ग्रामीण भागातील बत्ती गूल झाली आहे. लाईट गेल्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची कामे खोळंबली असून महिलांना घरगुती कामात देखील अडचणी येत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या खासगी क्षेत्रामधील कंपन्यांना वीज क्षेत्रांमध्ये परवाना देण्यात येवू नये, ज्यामुळे विजपुरवठा खाजगी कंपन्याकडे जातील याची भिती महावितरण कंपन्यातील कर्मचार्यांना वाटत असल्याने, राज्यातील महावितरण कंपनीमध्ये कार्यरत सर्व कर्मचार्यांनी संप पुकारला आहे.
राज्यातील वीज कर्मचारी महावितरणच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ आजपासून तीन दिवस संपावर गेले असून नगर मध्ये महावितरण कार्यलय समोर सर्व कर्मचारी निदर्शने करत आहे.
यावेळी शिवसेनाच्या वतीने ( उद्धव ठाकरे गट) या संपास आपला पाठिंबा दिला यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, सचिन शिंदे, दत्ता जाधव, संदीप दातरंगे आदी उपस्थित होते.
Tags:
Breaking