। बीड । दि.25 जानेवारी 2023 । बाजाराला जाण्यासाठी पहाटे लवकर उठून कामाला लागलेल्या पती-पत्नीचा हिटरचा शॉक बसून मृत्यू झाला आहे.
वृध्द व्यक्तीचे घर फोडून संसार उपयोगी वस्तु व रोख रक्कम लांबवली
माहिती अशी की, रात्री तीन वाजता बाजाराच्या ठिकाणी जायचे होते. पहाटे लवकर उठून पाण्याचे हिटर बाथरूममध्ये लावले व कोलगेट ब्रश करत ज्ञानेश्वर सुरवसे पत्नीला बाकीची आवराआवर करण्याची सांगत बाथरूमकडे आंघोळीसाठी गेले.
भिंगार परिसरात चेन स्नॅचिंग करणारा सराईत जेरबंद
तर त्या वेळी हिटरचा शॉक बसला. त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर ते ऐकून त्यांची पत्नी सिंधुबाई सुरवसे या त्यांच्याकडे धावत गेल्या. तर यांना विजेचा शॉक लागल्यामुळे त्यांनी त्यांना पकडले.
दुचाकी झाडावर आदळून अपघात ; दोघांचा मृत्यू
दोघांचा देखील विजेचा शॉक लागला व दोघेही मरण पावले. ही घटना पिंपळगाव परिसरात पसरताच नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली. तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले.
अतिक्रमणांवर कारवाई संदर्भात आयुक्तांची सोमवारी बैठक
ही घटना माहीत होताच त्यांची मुलगी व नातेवाईकांनी टाहो फोडलेला. अत्यंत कष्टाळू व गरीब कुटुंबातील असल्याने अनेक दिवसांपासून हॉटेल व्यवसाय करत असल्याने परिसरातील नागरिकांचाही संपर्क मोठा होता. या घटनेेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महावितरणमधून बोलतो, असे सांगून फसवणुक