नाशिक पदवीधरसाठी भानुदास बेरड यांना उमेदवारी द्यावी : भाजप आढावा बैठकीत मागणी


। अहमदनगर । । दि.05 जानेवारी 2023 ।  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपाच्या निष्ठावाण कार्यकर्त्यांलाच पक्षाने उमेदवारी द्यावी. पक्षाशी संबंध नसलेल्या बाहेरील कोणालाही उमेदवारी देऊ  नये, अशी मागणी करीत भाजपाच्या निष्ठावाण कार्यकर्त्यांनी संतप्त भावना आढावा बैठकीत व्यक्त केल्या आहेत. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड यांना पक्षाने उमेदवारी देण्याची मागणी यावेळी सर्वानुमते करण्यात आली.

भाजपकडून अजून उमेदवारी निश्चित झालेली नाही. नगर मनपाचे काँग्रेसचे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा प्रभारी पांगारकर यांच्या उपस्थितीत शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांची येथे आढावा बैठक झाली.

यावेळी अनेक पदाधिकार्‍यांनी निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात संतप्त भावना व्यक्त केल्या. आमच्यावर बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, असाच सूर यावेळी बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा होता.

यावेळी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांच्यासह संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक, सरचिटणीस महेश नामदे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, सचिन पारखी, संतोष गांधी, ज्ञानेश्वर काळे, कालिंदी केसकर, रेखा मैड, ज्योत्स्ना मुंगी, वसंत राठोड, प्रदीप परदेशी, राहुल रासकर, सुमित बटूळे, लक्ष्मीकांत तिवारी, मीनानाथ मैड, बाळासाहेब गायकवाड, अजय चितळे, अनिल सबलोक, 

शरद बारस्कर, बाळासाहेब भुजबळ, शशांक कुलकर्णी, मधुर जोशी, किशोर कटोरे, सुनील सकट, अशोक भोसले, दिलीप जाधव, पोपट भोसले, अनिल गट्टाणी, दीपक देहरेकर, रियाज कुरेशी, किशोर रायमुकर, आसिफ सय्यद, दत्ता गाडळकर, अंतोन गायकवाड, श्रीकांत फंड, राहुल बुधवंत, विशाल खैरे, विजय गायकवाड, सागर शिंदे, मिलिंद भालसिंग, चंद्रकांत पाटोळे, अशोक भोसले, कुंडलिक गदादे, शेखर रामदासी, अमोल निस्ताने, गोपाल व्यास, प्रशांत मुथा, रामदास आंधळे, अमित गाडेकर, रवींद्र गांधी व नरेश चव्हाण उपस्थित होते.

-------

अहमदनगर प्रेस क्लबचे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार जाहीर 

पोलिस भरती प्रक्रिया सुरु : पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी 

‘पदवीधर’मधून उमेदवारी द्या : धनंजय जाधव यांची भाजपकडे मागणी  

Post a Comment

Previous Post Next Post