पोलिस भरती प्रक्रिया सुरु : पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी


। अहमदनगर । । दि.04 जानेवारी 2023 ।   येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दुसर्‍या दिवशीही पोलीस चालक पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी 326 उमेदवारांनी हजेरी लावली. यातील 48 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरविण्यात आले. उर्वरित 278 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. दरम्यान दुसर्‍या दिवशी 559 उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यापैकी 326 जण हजर राहिले तर 233 जणांनी दांडी मारली.

पोलीस भरतीच्या नगर जिल्ह्यातील 139 जागेसाठी 12 हजार 334 अर्ज दाखल झाले आहेत. आता प्रत्येक्षात मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी चालक पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले आहे. सोमवारी 200 उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. यातील 48 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीत अपात्र ठरविण्यात आले. मंगळवारी 326 उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले होते. त्यातील 48 उमेदवारांना अपात्र ठरविले.

स्वत: जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (गृह) कमलाकर जाधव, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्यासह अधिकारी, अंमलदार उपस्थित होते. सुरूवातीला उपस्थित उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर उंची, छातीचे मोजमाप करण्यात आले. यानंतर गोळा फेक व 1600 मीटर धावणेची चाचणी पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post