। अहमदनगर । । दि.02 जानेवारी 2023 । अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज संस्थेच्या अंतर्गत आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या महाविदयालयीन शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार् यांची कामधेनू म्हणून परिचित असलेल्या सेवक कल्याण निधीची पंचवार्षिक 2022-27 ची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होऊन सर्वसाधारण सभेत न्यू आर्टस्, कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज, नगर येथील प्रा. संगिता निंबाळकर यांची चेअरमनपदी तर सचिवपदी न्यू लॉ कॉलेजचे प्रा. रामेश्वर दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाली.
तसेच व्हाईस चेअरमनदी योगेश शेळके, सहसचिवपदी प्रा. भाऊसाहेब आडसरे तर खजिनदारपदी प्रा. राजेंद्र जाधव यांचीही संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऍड. ए. बी. भालसिंग यांनी दिली. सेवक कल्याण निधीचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे तसेच शिक्षक नेते प्रा. संजय जाजगे यांनी संचालक मंडळ निवड आणि पदाधिकारी निवडीसाठी विशेष मेहनत घेऊन सेवक कल्याण निधीचा निवडणूकीचा अवास्तव खर्च वाचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. सदरच्या संस्थेमार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना अल्प व्याजदरात त्वरीत कर्ज उपलब्ध करून देणे, मोफत आर्थिक वैदयकीय मदत, सेवानिवृत्तीनंतर विशेष आर्थिक लाभ, कर्मचार्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत देणे इ. विविध योजना आणि लाभ मिळवून देण्यात येतात.
सेवक कल्याण निधीचे नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ पुढीलप्रमाणे – शेळके योगेश भागचंद (नगर), हिरणवाळे दत्तात्रय गिरीजाप्पा (नगर), प्रा. गायकवाड श्रीकृष्ण बाबू (नगर), प्रा. आडसरे भाउसाहेब नारायण (शेवगाव), प्रा. गोरे सुभाष आसाराम (नगर), प्रा. जाजगे संजय बन्सीराम (नगर), आठरे बाळासाहेब कचरू (शेवगाव), प्रा. घोरपडे अशोक विश्वनाथ (पारनेर), प्रा. जाधव राजेंद्र जयराम (नगर) तसेच स्विकृत संचालकपदी आठरे विष्णू भगवान आणि पदसिध्द संचालक प्राचार्य डॉ. झावरे भास्कर हरी, प्राचार्य तांबे एम.एम. प्राचार्य डॉ. आहेर आर.के.,
प्राचार्य डॉ. मतकर एल.एस. प्राचार्य कुंदे पुरूषोत्तम व प्राचार्य प्रा. सदरे वाय. एस. तसेच व्यवस्थापकपदाची धुरा अजित निमसे समर्थपणे पहात आहेत. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ऍड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर व संस्थेचे सर्व विश्वस्त मंडळ आणि कार्यकारीणी सदस्य यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि पदाधिकारी यांचे अभिनंदन करून सेवक कल्याण निधीच्या विकासाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.