। नागपूर । दि.15 जानेवारी 2023 । भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. त्यांच्या नागपूर येथील कार्यालयात यासंबंधी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावे धमकीचे फोन आलेत. त्यात गडकरींकडे खंडणी मागण्यात आल्याची माहिती आहे.
या प्रकारानंतर गडकरींच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील खामला परिसरातील कार्यालयात शनिवारी धमकीचे 3 फोन आले. सकाळी 11.30 च्या सुमारास पहिला फोन आला.
त्यानंतर काही वेळाने दुसरा व तिसरा फोन आला. त्यात फोन करणार्या व्यक्तीने दाऊदचे नाव घेत गडकरींकडे खंडणीची मागणी करण्यात आली. पैशांची मागणी पूर्ण करण्यात आली नाही तर गडकरींना जीवे देणारा म्हणाला.
या दूरध्वनीनंतर कार्यालयातील कर्मचार्यांनी तातडीने त्याची माहिती पोलिसांना दिली. तद्नंतर पोलिसांनीही तातडीने गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात धाव घेऊन तपास सुरू केला. सायबर पोलिसांचे एक पथकसुद्धा घटनास्थळी पोहोचले आहे.
हे सर्वजण फोन कुठून आला याचा शोध घेत आहेत. उच्चपदस्थ पोलिस अधिकारीही गडकरींच्या
कार्यालयात पोहोचले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या नागपूरमध्येच आहेत. त्यातच हे
धमकीचे फोन आल्यामुळे पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
----
💥 गूगलने दखल घेतली पण सरकारने नाही! : संभाजीराजे
💥 डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन
💥 कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी