। अहमदनगर । । दि.04 जानेवारी 2023 । नाशिक पदवीधर मतदारसंघाची मला संपूर्ण माहिती असून नगर जिल्ह्यातून जास्त मतदार नोंदणी झालेली आहे. या मतदारसंघातून उमदेवारी करण्यास आपण इच्छुक असल्याचे स्पष्ट करीत माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भाजपचे अनेक वर्षापासून काम करीत आहे. कुटुंब 40 ते 50 वर्षापासून सक्रिय राजकारणात आहे. पत्नी विद्यमान नगरसेविका आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात 1 वर्षांपासून नाशिक पदवीधर हक्क समितीच्या माध्यमातून नावनोंदणी केली आहे.
मतदारसंघातील शिक्षक, कर्मचारी व सामान्य पदवीधरांसाठी त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मी स्वत: वकील असल्यामुळे माझे संपूर्ण मतदारसंघात वकीलांशी व इतर सर्व क्षेत्रातील लोकांशी चांगले संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे व खा. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीचे कार्य करीत आहे.
-------
व्यापार्याला गाठून लाकडी दांडक्याने मारहाण
उद्योजक संजय चव्हाण यांना महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार प्रदान