नगरच्या पुणे बसस्थानकावर युवतीची सोन्याची चेन लांबवली


। अहमदनगर । । दि.01 जानेवारी 2023 ।  बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने युवतीच्या गळ्यातील सव्वा तोळे वजनाची सोन्याची चैन लंपास केली. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता येथील पुणे बस स्थानकावर ही घटना घडली. 

या प्रकरणी अमृता प्रशांत पितळे (वय 19 रा. शांताई बंगला, सिताबन लॉनसमोर, मार्केटयार्ड) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमृता त्यांची आई व बहिणीसोबत पुणे येथे जाण्यासाठी शनिवारी दुपारी पुणे बस स्थानकावर गेल्या होत्या. बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी होती. अमृता त्यांच्या आई व बहिणीसोबत गेवराई-पुणे या बसमध्ये चढत असताना त्यांना गळ्यात चैन सरकल्याची जाणीव झाली.

 त्यांनी खात्री केली असता त्यांना चैन गळ्यात नसल्याचे दिसून आले. बसमध्ये चढताना चैन चोरीला गेल्याचे अमृता यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी पुढील प्रवास रद्द करून कोतवाली पोलीस ठाणे गाठले. सव्वा तोळ्याची सोन्याची चैन चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली आहे.

-----


Post a Comment

Previous Post Next Post