। अहमदनगर । दि.16 जानेवारी 2023 । चार चाकी वाहनाने कोल्हार ते राहुरीकडे जाताना वॉशरूमसाठी राहुरी फॅॅक्टरी येथील समाधान हॉटेलजवळ थांबले असताना दोघांनी हातात हात घालून नकळत हातातील अडीच लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट अलगद काढून चोरून नेले.
या प्रकरणी राहुरी पोलिसांनी रामदास बाळासाहेब पांढरे (वय 38, राहणार संक्रापूर, तालुका राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोल सुनील बोर्डे (वय 28, राहणार प्रसाद नगर, राहुरी फॅक्टरी) व अक्षय मधुकर कदम (वय 24, राहणार रामपूर, तालुका राहुरी) यांच्याविरुद्ध चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
या प्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत. हातात हात घालून हातातील ब्रेसलेट लांबवण्याची ही घटना परिसरात मात्र चर्चेची झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.