औरंगाबाद शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवण्याची संभाजी ब्रिगेडची तयारी : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती.
शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची चर्चा सुरू असून दोन दिवसात निर्णय होणार : प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांची माहिती.
। औंरगाबाद । दि.01 जानेवारी 2023 । संभाजी ब्रिगेडने औरंगाबाद शिक्षक मतदार संघ आणि अमरावती पदवीधर मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून निवडणुकीची तयारी केलेली आहे. संभाजी ब्रिगेड या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे. शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती झाल्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची या दोन्ही मतदारसंघा संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून दोन दिवसात निर्णय होईल अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी औरंगाबाद येथे 1 जानेवारी 2023 रविवार रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड.मनोजदादा आखरे महासचिव सौरभदादा खेडेकर व केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत औरंगाबाद शिक्षक मचदार संघ आणि अमरावती पदविधर मतदार संघ या दोन्ही जागा लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेडची तयारी झाली असून निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकारिणी मंडळात निर्णय झाला.
परंतु संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना युती झालेली आहे आणि शिवसेना ही महाविकास आघाडी सोबत आहे.त्यामुळे पर्यायाने संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी सोबत आहे. महाविकास आघाडी सोबत चर्चा झाल्यानंतर जो निर्णय होईल तो निर्णय संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेचा असेल असेही डॉ.शिवानंद भानुसे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा वैशालीताई कडू संभाजी ब्रिगेडचे रवींद्र वाहटूळे व रेखाताई वाहटूळे उपस्थित होते.
Tags:
Breaking