। अहमदनगर । दि.07 जानेवारी 2023 । येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला तिसर्या दिवशी शुक्रवारी 675 उमेदवारांनी मैदानी चाचणीला हजेरी लावली. त्यातील 80 उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले तर 595 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.
शुक्रवारी 325 उमेदवार गैरहजर राहिले.नगर जिल्ह्यातील पोलीस शिपाई, चालक पदाच्या 139 जागेसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे स्वत: मैदानी चाचणीसाठी हजर असून पारदर्शक पध्दतीने चाचणी प्रक्रिया सुरू आहे.
शुक्रवारी एक हजार मुलांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र 325 जणांनी मैदानी चाचणीला गैरहजेरी लावली. 675 उमेदवार चाचणीसाठी दाखल झाले होते.
त्यातील 80 उमेदवार अपात्र ठरले तर 595 उमेदवारांनी चाचणी दिली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून थंडीमुळे चाचणी देण्यासाठी आलेल्या मुलांचे हाल होत आहे.
-------
💥 शेअर गुंतवणूकीच्या नावाखाली 3 कोटीची फसवणूक : पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
💥 राजकारणातील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर
💥 नाशिक पदवीधरसाठी भानुदास बेरड यांना उमेदवारी द्यावी : भाजप आढावा बैठकीत मागणी
Tags:
Breaking