। अहमदनगर । दि.07 जानेवारी 2023 । नगरच्या रेडीमिन्टस कन्सल्टन्सी कंपनीमार्फत शेअर्समध्ये व इंजिनिअरिंग कंपनीमध्ये पुण्याच्या व्यावसायिकाने सुमारे 3 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कालांतराने डिमॅट खात्यात चक्क झिरो बॅलन्स आढळल्याने या व्यावसायिकाला धक्काच बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नगर, नाशिक व मुंबईच्या दोघांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक गणेश परसराम कदम (वय 33, गंगा आर्केडीया, खराडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कदम यांनी सन 2018 पासून बुरुडगाव रस्त्यावरील रेडीमिन्टस कन्सल्टन्सी कंपनीमार्फत शेअर्समध्ये व अभिरचना इंजिनिअरिंग कंपनीमध्ये गुंतवणूक केली. या गुंतवणुकीपोटी त्यांना काही महिने 4 टक्के ब्रोकरेज देण्यात आला. त्यानंतर ब्रोकरेज देणेही बंद केले.
तसेच डिमॅट खात्यात झिरो बॅलन्स दाखविण्यात आला. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कदम यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 3 कोटी 2 लाख 59 हजार हजार रुपयांची संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे करत आहेत.
--------
💥 राजकारणातील सच्चा समाजकारणी : माजी आ.दादाभाऊ कळमकर
💥 नाशिक पदवीधरसाठी भानुदास बेरड यांना उमेदवारी द्यावी : भाजप आढावा बैठकीत मागणी
💥 चिनी मांज्याची विक्री करणार्यावर कठोर कारवाइ करावी : जाणीव फाउंडेशन